ई-रिक्षा वाहनाची रंगसंगती निश्चित करण्याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता Ø ई-रिक्षाचे हुड निळ्या तर उर्वरित सांगाडा पांढऱ्या रंगाने रंगविण्याचे आदेश

ई-रिक्षा वाहनाची रंगसंगती निश्चित करण्याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता

Ø ई-रिक्षाचे हुड निळ्या तर उर्वरित सांगाडा पांढऱ्या रंगाने रंगविण्याचे आदेश

चंद्रपूर दि. 10: जिल्ह्यातील सर्व ई-रिक्षा, प्रत्येक ई-रिक्षाचे हुड निळ्या रंगाने आणि उर्वरित सांगाडा पांढऱ्या रंगाने रंगविण्यात यावा. याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये राज्य परिवहन प्राधिकरण, मुंबई यांनी ई-रिक्षा वाहनाची रंगसंगती निश्चित करण्याबाबत ठराव क्र. 13/2020 दि. 2 मार्च 2020 यास परिणाम देण्यास चंद्रपूर, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी बांधलेले मुख्यत्वे तीन चाकी वाहन ज्याची बॅटरीवर चालण्याची ताकद 4 हजार वॅटपेक्षा जास्त नसेल अशा सर्व ई-रिक्षा प्रत्येक ई-रिक्षाचे हुड निळ्या रंगाने आणि उर्वरित सांगाडा पांढऱ्या रंगाने रंगविण्यात यावा.

सदर आदेश तात्काळ अंमलात येत असल्यामुळे ई-रिक्षा मालकाने/ वाहन विक्रेत्याने ई-रिक्षा रंगसंगतीमध्ये बदल करावा. अन्यथा पोलीस व परिवहन विभागाद्वारे कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.