गावात कचरा मुक्त भारत संकल्पना राबवा – विवेक जॉनसन

“15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर” स्वच्छता ही सेवा उपक्रम

गावात कचरा मुक्त भारत संकल्पना राबवा – विवेक जॉनसन

चंद्रपूर (प्रतिनिधी)दिनांक -13/09/2023  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमीत्ताने “15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023” या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार असुन, स्वच्छता ही सेवा उपक्रमासाठी प्रत्येक गावात कचरा मुक्त भारत संकल्पना राबवावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे

स्वच्छता ही सेवा 2023 ची थीम कचरामुक्त भारत आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावरती लक्ष केंद्रित केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून, यामध्ये स्वयंस्फुरतेने श्रमदान करणे गरजेचे आहे. या स्वच्छता मोहिमेला लक्ष केंद्रित करुन, ग्रामीण भागातील बसस्थानक, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदी सार्वजनिक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात संयुक्त मोहीम राबविली जाणार आहे.

भारतीय स्वच्छता लीग 2.0 स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकांच्या नेतृत्वाखाली सर्व गटांना एकत्रित करुन त्यांच्या गटाकडून स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून पर्यावरण विशेषता टेकड्या स्वच्छ करण्यासाठी राज्यभरात 17 सप्टेंबर 2023 रोजी स्वच्छता मोहिमेसह इतर उपक्रमांचही आयोजन करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. शाळा अंगणवाडी मध्ये उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

15 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री साधणार ऑनलाईन संवाद मंत्री महोदय जलशक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या हस्ते 15 सप्टेंबर 2023 रोजी व्हीडीओ कॉन्फरन्स कार्यक्रमाद्वारे संयुक्तपणे स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा शुभारंभ करुन, संवाद कार्यक्रमाद्वारे सरपंच, जिल्हाधीकारी, मुख्य कार्यकारी अधीकारी, गट विकास अधीकारी तसेच शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतर अधिकारी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत.

स्वच्छता ही सेवा उपक्रम चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबविण्यात यावा. ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या स्वच्छते साठी या मोहीमेत स्वतःहुन सहभागी व्हावे. या उपक्रमातुन सर्व गावातील चौक, सार्वजनिक परिसर नदी काठचा परिसर स्वच्छ करुन, नियमित स्वच्छ राखण्याचा संकल्प करावा.  – विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपुर.