chandrapur I राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर,दि. 19 मे : राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार,दि. 20 मे 2021 रोजी दुपारी 3:00 वाजता औष्णिक विद्युत केंद्र,खापरखेडा जि.नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 5:00 वाजता औष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे आगमन व राखीव.

शुक्रवार, दि. 21 मे 2021 रोजी सकाळी 8:30 ते 10:00 यावेळेत औष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे पाहणी. सकाळी 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे पक्ष पदाधिकारी यांच्यासमवेत अनौपचारीक चर्चा. दुपारी 12:00 ते 4:00 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. सायंकाळी 4:00 वाजता चंद्रपूर येथून औष्णिक विद्युत केंद्र पारस जि.अकोला कडे प्रयाण करतील.