विशेष लेख -1 शासन आपल्या दारी उपक्रमाची फलश्रुती नागरिकांना दोन लाख  दाखले व  शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

विशेष लेख -1 शासन आपल्या दारी उपक्रमाची फलश्रुती नागरिकांना दोन लाख  दाखले व  शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

       भंडारा,दि.6 : जिल्हयातील नागरिकांना दोन लाख  दाखले व  शासकीय योजनांच्या लाभांचे  वितरण  थेट नागरिकांना   देण्यात आले आहे.राज्यभर  यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाची सुरूवात एप्रिल महिन्यापासून झाली असून मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मार्गदर्शनात जिल्हयात लवकरच जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

       त्यादृष्ट्रीने  जिल्हा प्रशासन तयारीला लागले असून जिल्हाधिकारी श्री.योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

          शासनाची नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. काही वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्णपणे सफल होत नाही. यासाठी शासनाने शासन आपल्या दारी उपक्रम सुरु केले आहे.

         स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सामान्य नागरिकांना आवश्यक असणारे दाखले दिल्याने त्यांचे पैसे,वेळ,व श्रम वाचले आहे.जिल्हा  मुख्यालयापासून दूर असणा-या भागातील नागरिकांना यांचा विशेष् लाभ झाला आहे.तहसील कार्यालय,लाखांदूरमार्फत नऊ हजार नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. जात पडताळणीसारख्या महत्वाच्या विषयाचे जिल्हयात 700 हून अधिक दाखले वाटप झाले आहेत.

             शासनाच्या सर्व विभागांनी या उपक्रमाला मिशन मोडवर राबविल्याने दिलेल्या 75 हजारांच्या उददीष्टांपेक्षा जास्त म्हणजे 2 लाख लाभ व दाखले नागरिकांना मिळाले आहेत. या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले असुन याव्दारे या उपक्रमाच्या दैनिक प्रगतीची नोंद घेण्यात येते.

जिल्हा माहिती कार्यालय,भंडारा