वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण

वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण

गडचिरोली, दि.15 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर देशात सर्वत्र” आजादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा परिषद, गडचिरोली कडुन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 9 ते 17 ऑगष्ट 2022 या कालावधीत”स्वराज्य महोत्सव” अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने दिनांक 14 ऑगष्ट 2022 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिध्द व ऐतिहासिक वैरागड येथील किल्ल्यावर जिल्हा परिषद, गडचिरोलीचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे शुभहस्ते सकाळी 07.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर जिल्हा परिषद मुलांची शाळा वैरागड येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी “माझी कन्या भाग्यश्री योजना” 2017 अंतर्गत कु. काव्या राजेश्वर दोनाडकर यांना रुपये 25000/-, कु.अनन्या राजेश्वर दोनाडकर यांना रुपये 25000/-, कु. नव्या प्रमोद धोंगडे यांना रुपये 25000/- चा धनादेश वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, यांचे शुभहस्ते करण्यात आले.

तसेच याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन कृष्णाजी गजबे, विधान सभा सदस्य, आरमोरी हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी “हर घर तिरंगा” या उपक्रमांबद्दल उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. त्यांनतर मान्यवरचे हस्ते रक्तदान

शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. हरीरामजी वरखडे, माजी आमदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र.एम. भुयार, फरेंद्र आर.कुतीरकर, प्रकल्प संचालक, जल जिवन मिशन, कल्याणकुमार डहाट, तहसिलदार आरमोरी, खाते प्रमुखांमध्ये शेखर माधव शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.), रविंद्र कणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), ओंकार अंबपकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्रीमती अर्चना इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.), अमित तुरकर, कार्यकारी अभियंता (ग्रापापु), अरुण धामणे, शिक्षणाधिकारी (प्राथ.), माणिक चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा), चेतन हिवंज, गट विकास अधिकारी पं.स.आरमोरी, श्रीमती संगिताताई पेंदाम, सरपंच वैरागड, भास्कर बोळणे, उपसरपंच वैरागड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचलन राजू वडपल्लीवार केंद्रप्रमुख सिर्सी आणि मोहझरी यांनी केले. तर आभार संगीताताई पेंदाम, सरपंच ग्रामपचांयत वैरागड यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भास्कर बोळणे, उपसरपंच वैरागड, श्री. कोकुडे, गट शिक्षण अधिकारी, राजकुमार पारधी, वि.अ.पं.स.आरमोरी, प्रभाकर बोधेले, ग्रामविकास अधिकारी, श्री. भाकरे, श्री. बोबाटे, श्री. उंदिरवाडे, श्री. राऊत, तसेच ग्रामपंचायत वैरागड येथील पदाधिकारी यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल पंचायत समिती, आरमोरी येथील अधिकारी व कर्मचारी वृंद, ग्रामपंचायत वैरागड पदाधिकारी व कर्मचारी वृंद व ग्रामस्थ यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभिनंदन केले. गावातील स्वच्छता हेच खरे देशप्रेम- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, कुमार आशिर्वाद- आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल पण हेच स्वातंत्र्य अबाधित राखणे आवश्यक आहे. हया सोबत आपण गावांमध्ये स्वच्छता ठेवू या. हिच खरी देशसेवा आहे आणि हेच खरे देशप्रेम आहे.