जिल्हास्तरीय शालेय बुडो स्पर्धाचे आयोजन 

जिल्हास्तरीय शालेय बुडो स्पर्धाचे आयोजन 

गडचिरोली, दि.19: क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बुडो क्रीडा स्पर्धेचे आयोजन नमुद अटी व शर्थीच्या अधीन राहून गडचिरोली जिल्हा बुडो संघटनेच्या संपूर्णपणे तांत्रीक व आर्थीक जबाबदारीने दिनांक 29 आक्टोंबर 2022 रोजी सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, आष्टी येथे करण्यात येत आहे.

तरी गडचिरोली जिल्हयातील सदर स्पर्धेत सहभागी होणा-या इच्छूक शैक्षणीक संस्था/ खेळाडूंनी दिनांक 29 आक्टोंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, आष्टी ता. चामोर्शी येथे आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. सदर स्पर्धेविषयी आवश्यक माहीती करीता श्री कपील मसराम यांचेशी 9403914935 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जिल्हास्तर बुडो स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी आपला प्रवेश फी चा भरणा करून घ्यावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.