तालुका व शाळास्तरांवर पौष्टीक पाककृती  स्पर्धांचे होणार आयोजन सर्वोत्कृष्ट पाककृतींसाठी रोख बक्षीसे

तालुका व शाळास्तरांवर पौष्टीक पाककृती  स्पर्धांचे होणार आयोजन सर्वोत्कृष्ट पाककृतींसाठी रोख बक्षीसे

           भंडारा, दि.6: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळा व केंद्र तालुकास्तरावर  पौष्टीक पाककृती स्पर्धांचे आयोजन 15 संप्टेंबरपर्यत करण्यात येणार आहे.या स्पर्धेत पालक,नागरिक, यांनी सहभाग घेण्याचे आवाहन   शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के यांनी केले आहे.

       सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये शाळांमधून मोठया प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती, पालक,  विद्यार्थी व शिक्षक यांनी सहकार्यांनी परसबाग विकसित केलेल्या आहेत.विकसित करण्यात आलेल्या परसबागेतील उत्पादीत भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये देखील करण्यात येत आहे.केंद्र शासनाने देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जागृती करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

        बदलत्या जीवनशैलीत जंकफुड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या आहारातून पौष्टिक तृणधान्यांचा वापर कमी होत चालला आहे.वास्तविकतस पौष्टिक तृणधान्यांचा उपयोग आपल्या रोजच्या ऊर्जेच्या गरजा भगवण्यासाठी होणे आवश्यक आहे.आपला आहार हा कर्बोदके, प्रथिने,जीवनसत्वानी समृध्द असणे आवश्यक आहे.सदर गरज तृणधान्यामधून भागविणे शक्य आहे.

         विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्ययुक्त आहाराची सवय लावणे आवश्यक आहे. याकरिता व तृणधान्यापासून निर्मित विविध पाककृतीचा समावेश  रोजच्या आहारामध्ये केल्यास मुलांना आहारातअवेगळपणा मिळेल.पाककृती स्पर्धाचे आयोजनाबाबत शालेय शिक्षण विभागाने  दिलेल्या सूचनेनुसार शाळास्तरावर  पालक, नागरिक व योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्यासाठी तृणधान्य आधारीत पाककृती स्पर्धाचे आयोजन करणे व एका उत्कृष्ट पाककृतीची निवड तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी करणे.तसेच या  उपक्रमाचे आयोजन शक्यतो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवडयामध्ये करावे.व शाळा परिसरातील जास्तीत जास्त माता-पालक या उपक्रमामध्ये सहभागी होतील याकरिता आवश्यक ती जनजागृती करण्याचे निर्देश  दिले आहे.

           तसेच तालुकास्तरावर शाळास्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्त पाककृतींची स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात यावी, व तालुकास्तरावरील स्पर्धा दुसऱ्या आठवडयामध्ये घेण्यात यावी. तालुकास्तरावरील सर्वोत्कृष्ट पाककृतीसाठी प्रथम बक्षीस 5 हजार रुपये,द्वितीय बक्षीस 3500 रुपये,तृतीय बक्षीस 2500 रुपये देण्यात येणार आहेत.  उत्कृष्ट पाककृतींची निवड करतांना तृणधान्यातील पौष्टिकता गुण 10, तृणधान्याचा दैंनदिन आहारातील उपयोग 10 गुण,तृणधान्याचा आरोग्यविषयक लाभ 10 गुण, तृणधान्याची चव,मांडणी व नाविन्यपूर्णता 10 गुण,पाककृती बनविण्याची कृती सुलभता व इंधन बचत 10 गुण  या निकषावर गुणांकन करण्यात येणार आहे.