जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने आहार रॅली

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने आहार रॅली

          भंडारा,दि.6 :सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो .त्या निमित्ताने  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील पोषाहार विभागामार्फत  आहाराचे महत्व अधोरखीत करण्यासाठी आहार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  या रॅलीव्दारे मानवाच्या मानसिक व शारिरीक विकासासाठी संतुलीत आहाराचे महत्व  अधारेखीत करण्यात आले.जीवनसत्वे,प्रथिने,खनिजे,वसा,कार्बोदके इत्यादी बाबी शरीराच्या वाढीसाठी फार महत्वाच्या असतात.

           त्यामुळे सामान्य माणसापर्यत आहाराबद्दल जनजागृती व्हावी या हेतुने सामान्य रुग्णालय येथील पोषाहार विभागामार्फत आहार रॅली काढण्यात आली. या आहार रॅलीला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.दीपचंद सोयाम व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. टेंभुर्ण यांनी हिरवी झेंडी दिली.

          यावेळी आहार प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.आहार प्रदर्शनीत रानभाज्या,कमी खर्चातील पाककृती, प्रथीनेयुक्त पदार्थ,उर्जा देणारे पदार्थ,लोहयुक्त पदार्थ,दररोज आहारात वापर करावयाचे पदार्थ, फळे, आहारात टाळले जाणारे पदार्थ,कडधान्य, आम्लयुक्त पदार्थ,मोड आलेली कडधान्य,इत्यादी पदार्थाची माहिती देण्यात आली.

      या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दीपचंद सोयाम यांनी केले.या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टेंभुर्णे व अधिसेविका श्रीमती लिमजे, आहारतज्ञ रंजना पांडे,परिसेविका बुलबुले, टिचकुले, डॉ. प्राची इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

       तसेच आहारतज्ञ श्रीमती  रंजना पांडे यांनी कार्यक्रमाविषयी प्रास्ताविकपर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  अधिक्षक सुधीर दहिवले यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परीसेविका श्रीमती टिचकुले यांनी केले.