दिव्यांग मतदार नोंदणी शिबिर

दिव्यांग मतदार नोंदणी शिबिर

गडचिरोली, दि.01: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक 01.01.2024 या अर्हता दिनांकावर आधारित नव मतदार नोंदणी कार्यक्रमाचे अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, व सहाय्यक मतदार नोंदणी तथा तहसिलदार यांचे संयुक्त विद्यमानाने दिव्यांग मतदार नोंदणी शिबिर गडचिरोली पंचायत समिती सभागृहात घेण्यात आले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय मीणा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रसणजित प्रधान, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, व तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
सदर शिबिरात दिव्यांग मतदार नोंदणी अनुषंगाने दिव्यांग नव मतदार यांचेकडून नमुना -6 भरून घेण्यात आला. तसेच काही दिव्यांग मतदारांची Voter Helpline App व्दारे नोंदणी करण्यात आली. काही दिव्यांग मतदार यांचे नावात बदल / रहिवास पत्ता बदल इ. दुरुस्तीकरीता नमुना – 08 भरून घेण्यात आले. यावेळी दिव्यांग मतदारांनी आपल्या समस्या मांडल्या व त्याचे निराकरण करण्याची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागाशी तसेच इतर विभागाशी संबंधित दिव्यांग मतदारांची कामे /अडचणी निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.