जिल्हा नियंत्रण कक्षात मतदान जागृती शपथ 

जिल्हा नियंत्रण कक्षात मतदान जागृती शपथ 

            भंडारा, 10 : मतदान हे आपले आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीने आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी नियोजन भवन येथील नियंत्रण कक्षामध्ये आदर्श आचारसंहिता कक्ष, सी-व्हीजील कक्ष, तक्रार कक्ष, 1950 हेल्पलाइन कक्ष, यांच्यासह मीडिया सेंटर कक्षामध्ये कार्यरत अधिकारी कर्मचारी  यांनी आज मतदान जागृती शपथ घेतली. त्यानुसार निवडणूकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामध्ये ‘मिडीया सेंटर’ मध्ये जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ- दांदळे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ दिली.

           भारताच्या नागरीकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवावी. आपल्या लोकशाही परंपराचे जतन करावे. मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात मतदान करावे. निवडणूकांचे पावित्र्य राखावे, प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

         नोडल अधिकारी स्वीप रवींद्र सलामे, भूषण फसाटे, स्मिता गालफाडे यासह सर्व स्वीपची चमू यावेळी उपस्थित होती.