गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज तसेच येलो अलर्ट

गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज तसेच येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाचा इशारा

गडचिरोली, दि.17: प्रादेशिक हवामान केंद्र, भारतीय हवामान विभाग, नागपूर यांचेद्वारा दुपारी 12.40 वाजता प्रसारित संदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश भागात पुढील 05 दिवसांपैकी 03 दिवसाचे ऑरेंज अलर्ट व 02 दिवसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात संभावित मुसळधार अतिवृष्टी, पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने हवामान संदेश देण्यात आला आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.