गडचिरोली | केंद्रीय पथकाकडून अहेरी तालुक्यातील पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागास भेट

गडचिरोली | केंद्रीय पथकाकडून अहेरी तालुक्यातील पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागास भेट

गडचिरोली, दि.01: दिनांक 03 ऑगस्ट 2022 रोजी केंद्रीय पथकाने अहेरी तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेल्या भागास भेटी दिल्या तसेच, त्या ठिकाणच्या उपस्थित शेतकरी, सरपंच, ग्रामस्थ यांचेशी संवाद साधला. तसेच झालेल्या नुकसानीचा आढावाही घेतला. सदरील पथकाने आज देवलमरी, वद्रा व आवलमटि या स्थळी भेटी दिल्या. भेटी दरम्यान झालेलं पिकांचे नुकसान, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान तसेच जिवीत हानी बाबतची माहिती घेतली.

अहेरी तालुक्यामध्ये एकूण 6 महसूल मंडळ असून एकूण गावांची संख्या 184 आहेत. अतिवृष्टी काळात बाधित क्षेत्र 3399.54 हे.आर. एवढे आहे. तसेच अंशत: नुकसान झालेले 2094 घरे असून पुर्णत: नुकसान झालेले 07 घरे आहेत. तसेच यात जनावरे व मनुष्यहानीची माहिती केंद्रीय पथकाकडून माहिती जाणून घेण्यात आली.

सदरील दौऱ्याकरीता जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली बसवराज मासतोळी, उपविभागीय अधिकारी, अहेरी श्री. अंकित, उपविभागीय कृषि अधिकारी, अहेरी आनंद व्यं.गंजेवार, तहसीलदार अहेरी ओमकार ओतारी, गटविकास अधिकारी, प्रतिक चन्नावार, तालुका आरोग्य अधिकारी, अहेरी किरण वानखेडे, पशुवैद्यकिय अधिकारी पवन पावडे, तालुका कृषि अधिकारी संदेश खरात, मुख्याधिकारी अहेरी, अजय साळवे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री. मेश्राम आदि अधिकारी वर्ग उपस्थित होते.