दूध भेसळ प्रतिबंधक कारवाई 4नमुन्यांची तपासणी

दूध भेसळ प्रतिबंधक कारवाई 4नमुन्यांची तपासणी  

       भंडारा,दि.28 : दुधातील भेसळ रोखणेसाठी जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीने दूध भेसळ विरोधी कार्यवाहीस सुरुवात केली असून 25 ऑगस्ट 2023 रोजी 4 नमुने तपासणी करिता घेण्यात आले.अशी माहिती जिल्हास्तरीय दूध भेसळ समिती सदस्य सचिव तथा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,डॉ.मिना जे.चिमोटे यांनी दिली आहे.

           तसेच दुधात होणाऱ्या भेसळीवर पायबंद घालण्यासाठी सचिव पदुम यांनी सुचित केल्यानुसार जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष व अपर जिल्हाधिकारी विंचनकर यांचे मार्गदर्शनानुसार व अपर पोलीस अधिक्षक प्रतिनिधी  तुरकुंडे,व अन्न व औषध प्रशासन विभाग,चहादे,तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.वाय.एस.वंजारी, उपनियंत्रक वैद्यमापनशास्त्र टोंडरे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, डॉ. मिना. जे. चिमोटे, व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,भंडारा येथील प्रतिनिधी प्रदिप पात्रे यांचे पथकांने एकुण 4 दूध नमुन्यांची तपासणी करुन 4 दूध नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

           या पथकाने नागपूर रोड वरील मे.जैन डेअरी,बेला येथील दूध प्रक्रिया प्रकल्पावर अचानक भेट देऊन दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे.खाजगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व प्रक्रिया प्रकल्प यांनी उच्च गुणप्रतीचे भेसळ विरहित दूध स्विकृती करण्यात यावी,तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसह विक्री करणेबाबत तसेच त्याबाबत वापरात येणारे वजनकाटे व दूध तपासणी बाबतचे संयत्रे नियमित प्रमाणित करुन अद्यावत ठेवावे.

           या जिल्हयातील सर्व विक्रेत्यांना दुग्धजन्य पदार्थ उत्पादन दिनांक व मुदतपुर्व वापराबाबत तसेच खाजगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व प्रक्रिया प्रकल्प यांनी कोणत्याही परिस्थितीत भेसळयुक्त दूध स्विकारु नये असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,भंडारा यां विभागानी कळविले आहे.