बोरा बॅड अॅप संबधीत तक्रार असल्यास सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे संपर्ककरावे.

बोरा बॅड अॅप संबधीत तक्रार असल्यास सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे संपर्ककरावे.

भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेस आवाहन

आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ईलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे विकासात भर पडलेली दिसुन येत असली फसवणुकीचे प्रकारात सुध्दा दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.

भंडारा जिल्हयात काही दिवसांपुर्वी बोरा बॅड अॅप मध्ये जनतेने लाखो रुपये गुंतवणुक केले. परंतु अचानक बोरा बॅड अॅप बंद पडल्याने जनतेचे लाखो रुपये लंपास झाल्याने पो. स्टे. भंडारा येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. भंडारा जिल्हा पोलीसांतर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, यासारख्या प्रलोभनास बळी पडू नये. तसेच बोरा बॅड अॅप संबंधीत तक्रार असल्यास सायबर पोलीस स्टेशन, भंडारा येथे संपर्क करावे.