जिल्हयातील आदिवासी भागातील बालमृत्यु टाळण्याकरिता जिल्हास्तरीय…

जिल्हयातील आदिवासी भागातील बालमृत्यु टाळण्याकरिता जिल्हास्तरीय
गाभा समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

गडचिरोली,दि.28: जिल्ह्यातील विशेषता आदिवासी भागातील बालमृत्यु कमी करण्याकरिता सर्व
विभागाचा समन्वय साधुन आवश्यक त्या उपाय योजना करण्याकरिता शासनाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय गाभा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, व प्रकल्पस्तरीय गाभा समिती याप्रमाणे या समितीची रचना असुन जिल्हयात दर ३ महिण्यानी अध्यक्ष जिल्हास्तरीय गाभा समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत असते. दिनांक 24 ऑगस्ट 2023 ला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सदर सभेला जिल्हास्तरीय गाभा समितीचे सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी डॉ.दावल साळवे यांनी जिल्ह्यातील बाल मृत्युबाबत माहिती सभागृहात सादर केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी गरोदर पणातील सर्व सेवा या प्रामुख्याने देण्यात याव्या अशा सुचना दिल्या. भामरागड तालुक्यातील बाल मृत्युचे प्रमाण जास्त असल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी यांनी तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधुन बाल मृत्यु कसे कमी करता येणार याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्कता आहे. गरोदर मातेची प्रसुती हे संस्थतेच होणार याबाबत जनजागृती करावी. गरोदर मातांकरीता शासनाव्दारे राबविण्यात येणा-या सर्व योजनांचा लाभ गरोदर मातांना 100 टक्के देण्यात यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्हयात 0 ते 6 वयोगटातील जास्तीत जास्त बालंकांना एन.आर.सी. तसेच सि.टी.सी. मध्ये दाखल करण्याबाबत पालकांना प्रवृत्त करावे. याबाबत जनजागृती करावी. बालकांच्या आरोग्यामध्ये सुधारण घडवुन आणण्याकरिता प्रयत्न करावे. गावपातळीवर ग्राम बालविकास केन्द्राची स्थापना करण्यात यावी, जास्तीत जास्त बालकांचे श्रेणीवर्धण करण्याकरिता प्रयत्न करावे.
सर्व आरोग्य कर्मचारी, अगंणवाडी सेविका, आशा यांचे जिल्हास्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. प्रशिक्षणामध्ये बालकांचे धोक्याचे लक्षण ओळखने व बालमृत्यु कसे टाळता येणार याबाबत उजळणी प्रशिक्षण देण्यात यावे. मिशन इंद्रधनुष्य मोहिम 5.0 अतंर्गत एकही बालक लसीपासुन वंचित राहणार नाही. याकडे लक्ष देण्यात यावे. सभेला समितीचे सचिव डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली, डॉ.स्वप्निल बेले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, गडचिरोली डॉ. माधुरी किलनाके, वैद्यकीय अधिक्षक, महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली, प्रकल्प संचालक, मनरेगा, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली, डॉ. बागराज धुर्वे, निवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, गडचिरोली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) यांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.