मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत तांत्रिक शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत तांत्रिक शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना

चंद्रपूर, दि. 28 जुलै : अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय, मुंबई अंगिकृत मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीकरीता या महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता तांत्रिक शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी www.mamls.maharashtra.gov.in / www.mamfdc.org या वेबसाईटवर तथा रूम नं. 8 छोटी मस्जिद कॉम्प्लेक्स, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, कस्तुरबा रोड, चंद्रपूर या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नफीस शेख यांनी कळविले आहे.