तलवारबाजीसाठी निवड चाचणी 24 ऑगस्ट रोजी

तलवारबाजीसाठी निवड चाचणी 24 ऑगस्ट रोजी

       भंडारा, दि.22 : क्रीडा मंत्रालय,केंद्र शासन यांनी खेलो इंडिया सेंटर अंतर्गत भंडारा जिल्हयामध्ये तलवारबाजी या क्रिडा प्रकारचे केंद्र मंजूर केलेले आहे.त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्हास्तरीय खेळाडू निवड चाचणी 24 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित केली आहे. तरी जिल्हयातील 14 वर्ष वयोगटातील शाळेतील खेळाडूंनी या चाचणीत सहभागी होण्याच्या दृष्टीने 24 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती.अशा मेश्राम,यांनी कळविले आहे.