शासन आपल्या दारी विशेष प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

शासन आपल्या दारी विशेष प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

            भंडारा, दि.22 : शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअतर्गत निमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यांचे मार्फत 24 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जिल्हा क्रिडा संकुल,बसस्टॅड जवळ,या ठिकाणी विशेष ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

       तसेच मेळाव्याच्या नियोक्त्यांनी त्यांचेकडील रिक्तपदाची माहिती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील त्यांचे लॉगीनमधून विशेष ऑफलाईन प्लेसमेंट ड्रईव्ह येथे अधिसूचित करावीत तसेच नोकरीइच्छुक महिलांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावा.

          सदर मेळाव्यामध्ये मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखत व तत्सम प्रक्रीयेद्वारा उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्याच्या दिवशी व वेळेत उपस्थित राहावे,तसेच मेळावाला भंडारा जिल्हयातील  नोकरीइच्छुक व गरजू युवक व युवतीनी या सुवर्णसंधीचा आवश्यक लाभ घ्यावी, असे आवाहन सहय्यक आयुक्त, सुधाकर झळके जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यांनी कळविले आहे.