जिल्हाधिका-यांची पिडीत कुटुंबाला सांतवनपर भेट

जिल्हाधिका-यांची पिडीत कुटुंबाला सांतवनपर भेट

            भंडारा, दि.9:अडयाळ पोलीस स्टेशन अंतर्गत काही दिवसापुर्वी घडलेल्या अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत  दाखल गुन्हयातील पिडीत कुंटुबियांची आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज भेट घेतली .पिडीत कुटुंबीय साकोली येथे असून आज उपविभागीय अधिकारी अश्वीनी मांजे यांच्यासह समाजकल्याण विभागाचे प्रमोद गणवीर व अडयाळ पोलीस स्टेशनच्या प्रतिनीधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सदर घटनेबाबत चौकशी करून याबाबत नियमानुसार अर्थसहाय मिळवून देण्याचे निर्देश समाजकल्याण विभागाला दिले.