मोहाडी तहसील कार्यालयात महसूल दिनानिमित्त  करण्यात आले दाखले वाटप

मोहाडी तहसील कार्यालयात

महसूल दिनानिमित्त  करण्यात आले दाखले वाटप

भंडारा दि. 2: कालपासून राज्यभर सुरू झालेल्या महसूल सप्ताहानिमीत्त जिल्हयातही विविध उपक्रम सुरू आहेत. त्यामध्ये मोहाडी तहसील कार्यालयात दाखले वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाची सुरवातीला अन्नाभाऊं साठे यांच्या जयंतीनिमित्त फोटोला पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे वेळी अध्यक्ष स्थानी  तहसिलदार सुरेश वाघचौरे , नायब तहसिलदार, एस. वाय. चांदेवार , नायब तहसिलदार एन. वाय. तुरकर तसेच अन्न पुरवठा निरीक्षक पल्लवी मोहाडीकर कार्यालयातील कर्मचारी अव्वल कारकुन, मह.सहायक, शिपाई, पत्रकार सिराज शेख, ,यशवंत थोटे व गावकरी व्यक्ती उपस्थित होते.

यावेळी  विविध प्रकारचे दाखले – उत्त्पन प्रमाणपत्र , अधिवास प्रमाणपत्र,, नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र, सातबारा वाटप ,तसेच मा. जिल्हाधिकारी भंडारा यांचे निदेर्शानुसार म.ज. म. अ. १९६६ चे कलम १५५ मधील ९ प्रकरणापैकी ६ प्रकरणात दुरुस्तीचे आदेश पारीत करण्यात आले. राशन कार्ड ( बीपील, केशरी, अंतोदय) १० वाटप करण्यात आले. तसेच  उत्कृष्ट अधिकारी -कर्मचारी यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामध्ये  विजय बोरकर नायब तहसिलदार, भोंगाडे अव्वल कारकुन, विजय ब्राम्हणकर मंडळ अधिकारी, नरेश चव्हान मह. सहायक, धनराज शेंडे, शिपाई सुरेद्र घोडीचोर कोतवाल, कमलेश पाटिल कोतवाल, सचिन सेलोकर आपरेटर, विलास हेडावु आपरेटर,  कृष्णा भोयर वाहन चालक यांना प्रमाणपत्र देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.