जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर

चंद्रपूर, दि. 19 जुलै : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे हक्क शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाव बेटी पढाव आणि ज्युवेनाईल जस्टीस कायदा-2015 या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन दि. 14 जुलै रोजी जुबली हायस्कूल, चंद्रपूर येथे करण्यात आले होते.

या शिबिराप्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश एन. एम. पंचारीया, अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश पी. ए.जमाईवार, वकील अमृता वाघ, मुख्याध्यापिका सुजाता वाघमारे उपस्थित होते.

सह दिवाणी न्यायाधीश एन. एम. पंचारिया यांनी बालकांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण व त्यांचे अधिकार याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तर अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश जमाईवार यांनी बालकांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन केले. तर वकील अमृता वाघ यांनी ज्युवेनाईल जस्टीस कायदा-2015 या कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मोरेश्वर बारसागडे तर आभार शैलेश बरडे यांनी मानले. शिबिराला ज्युबली हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.