जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

भंडारा दि. 2: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 01 ते 02 ऑगष्ट 2023 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल व पोलीस परेड मैदान, भंडारा येथे करण्यात आलेले आहे.

14 वर्षाखालील मुले वयोगटातील स्पर्धा पोलीस परेड मैदान व 17 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटातील स्पर्धा हया छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात येत आहेत.

सदर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर यांचे हस्ते करण्यात आले असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, डॉ. प्रकाश सिंग, राजेंद्र भांडारकर हे होते. तर शंकर गुप्ता, योगेंद्र खोब्रागडे, ठाणेश्वर भोयर, राजेश गेडाम, सुषमा नेरकर, राहुल पाठक, संध्या भोवते, विजय मानापूरे, अपेक्षा कठाणे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर स्पर्धेमध्ये भंडारा जिल्हयातील 14 वर्षाखालील मुले वयोगटात 09 संघ, 17 वर्षाखालील मुले वयोगटात 16 संघ व 17 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात 03 संघ असे एकुण 28 संघानी सहभाग घेतलेला आहे.

स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुली वयोगटात अंतिम सामना सन्नीज स्प्रिंग डेल स्कुल विरुद्ध रॉयल पब्लीक स्कुल या संघामध्ये झाला असून सन्नीज स्प्रिंग डेल स्कुल या संघाने 3-00 ने विजय नोंदविला आहे. सन्नीज स्प्रिंग डेल स्कुल च्या प्रवज्या यांनी आपल्या संघाच्या वतीने 3 गोल केलेले आहे.