विशेष वृत्त/साथीचे आजाराचे उद्रेक होऊ नये म्हणून 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

विशेष वृत्त/साथीचे आजाराचे उद्रेक होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाची तयारी

· 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

 

भंडारा, दि.5: दरवर्षी पावसाळयात व पावसाळा पश्चात जलजन्य व किटकजन्य आजारांच्या साथी प्रामुख्याने आढळतात. पावसाळयामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होतात व त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य काविळ, विषमज्वर, इत्यादी आजारांचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळतात. यासाठी जिल्हयाचा आरोग्य विभागाने 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.

 

जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापणा करण्यात आली आहे. साथरोग नियंत्रण कक्षामध्ये अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे व हे कक्ष 24 तास सुरु राहील. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07184-253594 आहे.तसेच जिल्हास्तरीय सर्वेक्षण अधिकारी डॉ.सचिन चव्हाण, 9604807698, डॉ.श्रीकांत आंबेकर 9158512242 व श्री.आर.यु.थाटकर 99233522879 आवश्यकता असल्यास यांचेशी संपर्क साधावा.

 

पुराच्या पाण्याच्या संपर्कात असल्याने लेप्टोस्पॉयरॉसिस आजारही उदभवतात. तसेच ठिकठीकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती मोठया प्रमाणात होऊन हिवतात, डेंगु, चिकनगुनिया सारख्या किटकजन्य आजाराचा प्रादूर्भावही मोठया प्रमाणात आढळतो. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता पावसाळयात साथी जलजन्य व किटकजन्य उद्भवूनयेत यदाकदाचित साथीचा प्रादूर्भाव झाल्यास त्यावर त्वरेने उपाययोजना करता याव्यात या दृष्टीने आरोग्य विभागाने तयारी सुरु केली आहे.

 

जिल्हयातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी यांना आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबाबत खालील प्रमाणे यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहेत. जिल्हयामध्ये कुठल्याही आजाराचा साथउद्रेक झाल्यास त्यावर नियंत्रण व व्यवस्थापन करण्याकरीता जिल्हास्तरीय शिघ्र प्रतिसाद पथक तयार करण्यात आले असुन सर्व जिल्हास्तरीय अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलजन्य/किटकजन्य आजर प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियंत्रण याबाबत अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

जिल्हयातील सर्व आरोग्य संस्थेतील साथरोग नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असुन आवश्यक औषधी साठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. नदीकाठावरील गावांना अतिजोखमीचे गाव घोषीत करण्यात आले असुन, त्यागावात साथ उद्भ्वणार नाही याबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. वैद्यकिय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांनी त्यांना नेमुन दिलेल्या मुख्यालयी राहण्याबाबत सुचित करण्यात आलेले आहे. ब्लिचिंग पावडरद्वारे पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण TCL पावडरची साठवणूक बाबत मार्गदर्शक सुचना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा यांचे स्वाक्षरीने खंड विकास अधिकारी / तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती (सर्व) यांना निर्गमित करण्यात आलेले आहे. किटकजन्य/जलजन्य आजरांबाबत ग्रामपंचायत स्तरावर सरपंच व सचिव यांना जनजागृती मोहिम राबविण्याबाबत पत्र निर्गमित केले आहे. सर्पदंश/विंचू दंश या बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबतचे जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. दूर्गंम डोंगरी भागात तसेच जोखीतग्रस्त भागामध्ये वाहनांची तातडीने उपलब्धता करुन देण्यात येते. पावसाळयामध्ये किटकजन्य व जलजन्य आजाराचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात होतो यासाठी जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण/उपजिल्हा रुग्णालये दि.1 जुन 2023 ते 30 आक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये अत्यावश्यक व गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी 24 तास कार्यरत ठेवण्यात येत आहेत.

 

जिल्हयात कुठेही किटकजन्य, जलजन्य किंवा इतर आजारांचा प्रादूर्भाव आढळुन आल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेस संपर्क साधुन औषधोपचार करुन घ्यावे असे आवाहन डॉ.मिलींद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा यांनी केले आहे.