जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन

जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन

गडचिरोली, दि.24: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्यग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) , महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आणि नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सव २०२३-२४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी उद्घाटन समारोह पार पाडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक नेते, खासदार, गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.देवरावजी होळी, आमदार, विधानसभा क्षेत्र, गडचिरोली, कृष्णाजी गजबे, आमदार, विधानसभा क्षेत्र, आरमोरी, प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री, भा.ज.पा.,गडचिरोली, गिताताई हिंगे, जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी, भा.ज.पा, गडचिरोली, हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती धनाजी पाटील, अतिरीक्त जिल्हाधिकारी, गडचिरोली , पंढरी डाखळे, प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली, बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली, प्रशांत शिर्के, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली, विष्णुपंत झाडे, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), डॉ.माया राऊत, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, गडचिरोली, डॉ.संदिप क-हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख , कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली, एन.व्ही.पौनिकर, जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड, गडचिरोली हे उपस्थित होते.
उद्घाटनीय भाषणात अशोकजी नेते, खासदार, गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. कृषि महोत्सवाचा उद्देश केंद्र व राज्य शासनाच्या विवीध योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे आहे असे सांगितले. तसेच तालुकानिहाय शिबीर व बैठका घेऊन शेतक-यांपर्यंत विवीध योजनांचा लाभ मिळवुन देण्याचे विवीध विभागांना सुचना केली. केंद्र व राज्य शासनामार्फत शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना इ. योजनांची माहिती दिली. तसेच शेती सोबतच पुरक व्यवसाय करुन आपले उत्पन्न दुप्पट करण्याचे आव्हान शेतक-यांना केले.
डॉ.देवरावजी होळी, आमदार, विधानसभा क्षेत्र, गडचिरोली यांनी कृषी महोत्सवाच्या माध्यमातुन नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होते ते शेतक-यांनी आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे सांगितले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी, महिला व गावांचा विकास करण्यासाठी विवीध योजनांच्या माध्यमातुनकार्य सुरु आहे असे सांगितले.
कृष्णाजी गजबे, आमदार, विधानसभा क्षेत्र, आरमोरी यांनी कृषि महोत्सव कार्यक्रमात ज्या कर्मचारी व शेतक-यांचा सत्कार झाला त्यांचे अभिनंदन केले. गडचिरोली जिल्ह्यात ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत त्यांचे सक्षमीकरण करणे व त्यांना विवीध योजना उपलब्ध करुन त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच शेतक-यांनी नैसर्गिक पध्दतीने शेती करण्याचे आवाहन केले. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत लाभार्थी शेतक-यांनी EKYC करुन घेण्याचे आव्हान केले.
धनाजी पाटील, अतिरीक्त जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी जास्तीत जास्त संख्येने शेतक-यांनी कृषि प्रदर्शनाला भेट देऊन कार्यक्रमात आयोजीत मार्गदर्शन कार्यशाळांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच MGNREGA अंतर्गत विवीध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना पंढरी डाखळे, प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली यांनी केली. प्रस्तावनेतअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल पडेल किमतीत मध्यस्था किंवा व्यापाऱ्यांना विकवा लागतो. तोच माल ग्राहकांना मात्र चढ्या दरात खरेदी करावा लागतो. शेतकरी आणि ग्राहक दोघांचेही हित साधण्याच्या दृष्टीने कृषी, धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे असे सांगितले.
सदर कार्यक्रम प्रसंगी बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली, प्रशांत शिर्के , प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली, विष्णुपंत झाडे, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),डॉ.संदिप क-हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली, एन.व्ही.पौनिकर, जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड, गडचिरोली यांनी कार्यक्रमास उपस्थित शेतकरी व महिलांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन आबासाहेब धापते, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, गडचिरोली यांनी केले. सदर कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संखेने शेतकरी व महिला, विवीध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कृषि महोत्सवाचे आयोजन २३ ते २७ जानेवारी २०२४ दरम्यान करण्यात आलेले आहे तरी सदर कार्यक्रमास शेतकरी, महिला, स्थानीक नागरीक यांनी भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली यांनी केले.