27 एप्रिल 2023 रोजी विशेष ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळाव्याचे आयोजन

27 एप्रिल 2023 रोजी विशेष ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

भंडारा,  : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या मार्फत 27 एप्रिल 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शिवाजी स्टेडीयम भंडारा या ठिकाणी कार्यालयीन वेळेत महीलांसाठी विशेष प्लेसमेंट ड्राईव्ह/ पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या मेळाव्याच्या अनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्त्यांनी त्यांचेकडील रिक्तपदांची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर विशेष प्लेसमेंट ड्राईव्ह / पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा- 1 येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. तसेच जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी 27 एप्रिल रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे.

 

अधिक माहीतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रिडा संकुल, भंडारा येथे 07184252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क एसाधावा.