लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी बारा ओळखपत्र ग्राह्य

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी बारा ओळखपत्र ग्राह्य 

               दि.23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरीता 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहे.

        निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केल्यानंतर 16  मार्च ला अधिसूचना जारी केली. 11 भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात 19 एप्रिल ला निवडणूक होणार आहे .  या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता व्यावा या करीता स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे.

          त्यामूळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत निवडणूकीत मतदान करतांना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहेत. या बारा फोटो असलेल्या दस्तऐवजात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड,भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज,  केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार/आमदार/एमएलसी यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्रे आणि अद्वितीय अपंगत्व आयडी (UDID) कार्ड, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, भारत सरकार आदींचा समावेश आहे.  त्यामूळे लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला हक्क बजावू शकतील.