अहेरी येथे महिला व बाल विकास विभागाचा कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

अहेरी येथे महिला व बाल विकास विभागाचा कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

गडचिरोली, दि.04:दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी अभय केंद्र, संरक्षण अधिकारी कार्यालय महिला व बालविकास विभाग अहेरीच्या वतीने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 या विषयावर एक दिवसीय कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती अॅड. डंबोळे, विधी सेवा प्राधिकरण, अहेरी तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती एच. एम. कन्नाके पर्यवेक्षिका अहेरी, भामरागडचे संरक्षण अधिकारी बी. डी. पिपरे, अहेरीचे संरक्षण अधिकारी एम. व्ही. मारगोनवार, ॲड. रूपाली माकडे, अॅड. ज्योती ढोके, अॅड. रवीना खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती कन्नाके यांनी कायद्याअंतर्गत महिलांचे हक्क व अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अॅड. डंबोळे यांनी कायद्याअंतर्गत महिलांसाठी असलेल्या विविध आदेश कायद्यातील वकिलांची भूमिका तसेच या व्यतिरिक्त हुंडा प्रतिबंधक कायदा, कलम 498 अ, कलम 125 व इतर महिला विषयक कायद्यावर सखोल मार्गदर्शन केले. श्री. पिपरे यांनी कायद्याची रूपरेषा व कायद्याचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले तर या कायद्यातील संरक्षण अधिकाऱ्याची भूमिका एम. व्ही. मारगोनवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन ज्योती आमदे तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. पी. भांडेकर, रेखा निम्राड तसेच इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.