आदिवासी विदयार्थ्यासाठी वसतीगृह प्रवेश योजना ऑनलाईन अर्ज करावे प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे आवाहन

आदिवासी विदयार्थ्यासाठी वसतीगृह प्रवेश योजना ऑनलाईन अर्ज करावे प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे आवाहन

भंडारा, दि. 15 :आदिवासी विदयार्थ्यासाठी वसतीगृह प्रवेश योजना आदिवासी विकास विभागाव्दारे राबविण्यात येते.त्यासाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्याना शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरीता https://swayam.mahaonline .gov.in या प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता आदिवासी विदयार्थ्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

तरी ज्या विदयार्थ्यानी अदयापही वसतीगृह प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज केलेले नाही.त्यांनी तात्काळ उक्त नमुद संकेतस्थळवर अर्ज सादर करावे.तसेच अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृह गृहपाल किंवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन,निरज मोरे,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यांनी कळविले आहे.