संस्थाचालकांनी शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचे प्रवेशपत्र वितरीत करावे

संस्थाचालकांनी शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचे प्रवेशपत्र वितरीत करावे

 

भंडारा दि. 09: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अॅण्ड स्टुडन्टस् या दोनही परीक्षा दिनांक 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एकूण 285 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे (इंग्रजी 30 व 40 श.प्र.मि.) प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे 6 फेब्रुवारी 2023 पासून देण्यात आलेली आहेत.

 

संबंधित संगणक टंकलेखन संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परिक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षाथ्यांना वितरीत करण्याची व्यवस्था करावी, असे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

 

या परीक्षेसाठी प्रवेशपत्र वितरीत केल्यानंतर विद्यार्थ्याचे स्वत:चे नाव, आडनाव, वडिलांचे नाव / पतीचे नाव, आईचे नाव, विषय बदल, फोटो बदल, बॅच बदल इ. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करुन दिली जाणार नाही. परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावरील फक्त स्पेलिंग दुरूस्ती असेल व विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव/ पतीचे नाव, आईचे नाव, आडनाव यात बदल होत नसेल तरच परीक्षेपुर्वी तीन दिवस अगोदर म्हणजेच 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयात (विद्यार्थ्याचा फोटो व ओळखपत्रासह) समक्ष येऊन दंड रुपये 200/- आकारुन प्रवेशपत्रावर दुरूस्ती करुन घ्यावी. सर्व परीक्षार्थ्यांनी त्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावीत परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणतीही दुरूस्ती करून दिली जाणार नाही.