सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थाकडून प्रस्ताव आमंत्रित

सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थाकडून प्रस्ताव आमंत्रित

भंडारा दि. 09: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे कंत्राटी सफाई कामगारा करिता जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.

हे काम 11 महिन्याच्या कालावधीचे असून जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांनी दिनांक 16 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावे. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार करण्यात येणार नाही. कामाच्या अटी व शर्ती इत्यादीचा सविस्तर तपशिल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शिवाजी स्टेडीयम, भंडारा येथे सुचना फलकावर उपलब्ध आहे. अधिक माहिती करिता कार्यालयाच्या bhandararojgar@gmail.com या ईमेल वर किंवा 252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.