चंद्रपूर || शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

Ø 16 ते 30 जानेवारी कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 17 : क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करत असते.

शासनाने नुकत्याच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहित केली असून या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्याकडून दि. 16 ते 30 जानेवारी, 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर अर्जाचा नमूना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन, डाऊनलोड करून घ्यावा तसेच परिपूर्ण अर्ज भरून संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपरोक्त कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.