एकलव्य शाळा पुर्व प्रवेश परीक्षा येत्या रविवारी विदयार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे – प्रकल्प आदिवासी कार्यालयाचे आवाहन

एकलव्य शाळा पुर्व प्रवेश परीक्षा येत्या रविवारी

विदयार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे प्रकल्प आदिवासी कार्यालयाचे आवाहन

             भंडारा,दि. 23 :एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,भंडारा या कार्यालयामार्फत एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल प्रवेश परिक्षा इयत्ता 6 वी ते 9 वी करिता 25 फेब्रुवारी, 2024 रविवारी रोजी सकाळी 11 ते 2.00 या वेळेत खालील दिलेल्या केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.

परिक्षेच्या दिवशी स्पर्धा परिक्षा केंद्रावर मुख्याध्यापक व पालकांनी विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 वाजता परिक्षा केंद्रावर हजर करावे.

        परिक्षा केंद्र पुढीलप्रमाणे -जकातदार माध्यमिक व उच्च विद्यालय,भंडारा तसेच समाविष्ट तालुका भंडारा,मोहाडी, पवनी,जनता विद्यालय,तुमसर,समाविष्ट तालुका तुमसर, व नंदलाल कापगते विद्यालय,साकोली.समाविष्ट तालुका लाखांदूर,लाखनी,साकोली समाविष्ट करण्यात आले आहे शिक्षक व मुख्याध्यापक तसेच पालक यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे परिक्षा केंद्रावर उपस्थित करावे.तसेच ज्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेकरिता अर्ज केला नाही परंतु परीक्षेस बसण्यास इच्छुक आहेत.अशा विद्यार्थ्यांनी शाळेचे बोनाफाईड सर्टीफिकेट,उत्पन्न दाखला,व जातीचे प्रमाणपत्रासह जवळच्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी निरज मोरे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा विभागानी कळविले आहे.