भंडारा : शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज मागविले

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज मागविले

भंडारा, दि.22:- शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) भंडारा येथे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2021 सत्रात प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असून प्रवेशाची नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती ही http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश सत्र ऑगस्ट 2021 करिता संस्थेत एक वर्षीय अभ्यासक्रमासाठी 7 व्यवसाय व दोन वर्षीय अभ्यासक्रमासाठी 3 व्यवसाय प्रवेशाकरिता उपलब्ध आहे. इच्छूक उमेदवारांना प्रवेशाबाबत मार्गदर्शनासाठी संस्थेत दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत समुपदेशन व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. प्रवेश मार्गदर्शनाकरिता भ्रमनध्वनी क्रमांक 9423684989, 9420077104, 9922881337 यावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) श्रीमती जे. व्ही. निंबार्ते यांनी केले आहे.