बंगाली समाजाच्या हक्कासाठी सतत पाठपुरावा केला, जमिनीचे पट्टेही मिळवून देणार : अशोक नेते 

बंगाली समाजाच्या हक्कासाठी सतत पाठपुरावा केला, जमिनीचे पट्टेही मिळवून देणार : अशोक नेते 

गडचिरोली : गडचिरोली जिल्हावासियांचे मन खूप मोठे आहे. निर्वासित म्हणून या जिल्ह्यात आलेल्या बंगाली समाजाला या जिल्ह्याने आपल्यात सामावून घेतले. या बंगाली समाजाला हक्काची जमीन मिळावी यासाठी मी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे अनेक प्रश्न सोडविले. जमिनीच्या पट्ट्यांसह इतर प्रश्न पुढेही सोडविणार, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी बंगाली समाज बांधवांना दिली.

गडचिरोलीतील जनसंपर्क कार्यालयात बंगाली समाजबांधवांची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत खा.नेते यांनी बंगाली समाजासाठी त्यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी बंगाली समाजबांधवांनी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे सांगत हॅटट्रिक करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बैठकिला प्रामुख्याने बंगाली समाजाचे नेते दिपक हलदार,बंगाली आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा,मुलचेरा तालुकाध्यक्ष संजय सरकार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दता, जिल्हा महामंत्री सुभाष गणपती, बंगाली अध्यक्ष मोंटुलाल सरकार,बादल शहा,विधान वैद्य तसेच बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.