राज्यातील हंगामी स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी उपाय योजना

राज्यातील हंगामी स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी उपाय योजना

गडचिरोली, दि.09: राज्यातील बालकांचा मोफत सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार वय वर्ष 06 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क आहे. असे असेल तरी राज्यात पालकांचे विविध व्यवसायाच्या निमित्याने होणारे स्थलांतर व त्यामुळे मुलांच्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षणात खंड पडण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे.त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती जास्त आहे. सदर स्थलांतर साधारणत:माहे सप्टेंबर ते माहे मे या कालावधीत होत असते.तसेच विटभट्टी दगडखान मजूर,कोडसाखाणी,शेतमजूरी,बांधकाम व्यवसाय,रस्ते,नाले जिगींन मिल इत्यादी प्रकारच्या कामानिमित्त विविध कामगार स्थलांतर करीत असतात.राज्यातील हंगामी स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी करावयाच्या उपाय योजना संदर्भात राज्यस्तरावर SOP ( Standard Operating Procedure) आदर्श संचालन प्रक्रिया तयार करण्यात आली आहे. सदर SOP च्या अनुषंगाने त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करुन जिल्हयातील सर्व तालुक्यात स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण करणार आहे. सदर सर्वेक्षणात 03 ते 18 या वयोगटातील बालकांचा समावेश आहे. हे सर्वेक्षण दिनांक 20 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2022 या कालावधीत करणार आहे.असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.