तालुकास्तरीय साहित्य निर्मिती कार्यशाळा

तालुकास्तरीय साहित्य निर्मिती कार्यशाळा

 

भंडारा दि. 28 : पवनी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय (टीएलएम) अध्ययन अध्यापन शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा पवनी येथील स्पर्धा परीक्षा केंद्रात नुकतीच घेण्यात आली.

 

पवनी येथील पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी श्री. एन.टी. टिचकुले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

 

त्याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून चिचाळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील (मुले) सहाय्यक शिक्षिका कु. मंगला गणवीर व खांबाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. राहुल मेश्राम यांनी स्वतः तयार केलेल्या साहित्यांची ओळख प्रशिक्षणार्थ्यांना करून दिली. तसेच त्यांच्या कडून शैक्षणिक साहित्य तयार करून घेतले. विशेष म्हणजे समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता उपयोगी असणारे साहित्य तयार करण्यात आले.

 

त्यावेळी प्रशिक्षणार्थी श्री. प्रदीप बिलवने व कु. प्रिती कोचे यांनी मनोगतातुन कार्यशाळेबाबत सकारात्मक अभिप्राय व्यक्त केले. तालुकास्तरिय अध्ययन-अध्यापन शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळेत जवळपास २५ शिक्षक – शिक्षिका सहभागी झाले होते.

 

कार्यशाळेचे संचालन कु. दीपाली बोरीकर तर आभार डॉ. मुरलीधर रेहपाडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी समग्र शिक्षा अभियानाचे श्री. रामटेके, श्री. लांजेवार, श्री. शहारे, श्री. एम. डी. वाहाने, श्री. पारधी या कर्मचारी व पवनी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.