चार धाम यात्रा करणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी विशेष सुचना

चार धाम यात्रा करणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी विशेष सुचना

गडचिरोली, दि.02: उत्तराखंड सरकारांच्या असे निदर्शनास आले आहे की उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी होत असल्यामुळे पर्यटक, भक्तांची खूप गैरसोय होत आहे आणि त्यांना दर्शनासाठी बराच वेळ थांबावे लागते. त्यामूळे उत्तराखंड सरकारच्या पर्यटन विभागाने निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये चार धाम यात्रेसाठी उत्तराखंड राज्यात भेट देणाऱ्या भाविक किंवा पर्यटकांनी ऑनलाइन पोर्टल

https://registrationandtouristcare.uk.gov.in/ किंवा Tourist Care Uttarakhand मोबाईल अॅप द्वारे पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच अॅप नोंदणीशी संबंधित प्रश्नांसाठी अभ्यागत भक्तांच्या वापरासाठी टोल फ्री क्रमांक 01351364 जाहीर केला आहे. करिता गडचिरोली जिल्हयातील चार धाम यात्रेकरिता जाणा-या सर्व भाविकांना पर्यटकांना सुचित

करण्यात येते की, आपली चारधाम यात्रा करताना गैरसौय होऊ नये या करिता चारधाम यात्रे करिता जाण्यापुर्वी ऑनलाइन पोर्टल https://registrationandtouristcare.uk.gov.in/ किंवा मोबाईल अॅप Tourist Care Uttarakhand अॅपवर मोबाईल द्वारे पूर्व-नोंदणी करुन जावे.