ईओंनी केले “मातृ वंदना सप्ताह-2022” चे उद्घाटन 01 ते 07 सप्टेंबर दरम्यान संपुर्ण गडचिरोलीत सप्ताहाचे आयोजन

ईओंनी केले “मातृ वंदना सप्ताह-2022” चे उद्घाटन 01 ते 07 सप्टेंबर दरम्यान संपुर्ण गडचिरोलीत सप्ताहाचे आयोजन

गडचिरोली, दि.02:- दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुध्दा दिनांक 01 ते 07 सप्टेंबर 2022 या कालावधीत संपुर्ण गडचिरोली जिल्हयामध्ये आरोग्य विभागामार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थी म्हणजेच प्रथम खेपेची गरोदर माता असुन मातेचे आधार व बँक खाते तसेच पतीचे आधार यावरुन तीन टप्यांमध्ये 5000/- रुपयांचा लाभ डिबीटी द्वारे थेट मातेचे खात्यात केंद्र शासनाद्वारे जमा करण्यात येतो. गडचिरोली जिल्हयात दिनांक 02 सप्टेंबर 2022 रोजी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गडचिरोली यांचे हस्ते जिल्हास्तरीय “मातृ वंदना सप्ताह-2022” चे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र, बोदली येथे करण्यात आले. या वर्षीचे घोष वाक्य “मातृ शक्ती – राष्ट्र शक्ती” असे आहे.

कार्यक्रमामध्ये कु.अश्विनी मेंढे,जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांनी कार्यक्रमाचे ब्रीद वाक्य प्रस्तावित केले. या कार्यक्रमास श्रीमती अर्चना इंगोले, उप मुख्यकार्यकारी अधिकारी,महिला व बाल कल्याण विभाग जि.प.गडचिरोली उपस्थित होत्या. त्यांनी राष्ट्रीय पोषण महिना व मातृ वंदना सप्ताह एकत्रीत राबविण्याबाबत महिला व बाल कल्याण विभागाला सुचना केल्या. डॉ.दावल साळवे,जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दरम्यान जिल्हयातील तळागळातील सर्व मातांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचणार या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्रीय कार्य करीत आहे बाबतची माहिती दिली.कार्यक्रमा दरम्यान मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही योजना अत्यंत फायदेशिर असुन प्रत्येक पहिल्या खेपेच्या मातेनी रुपये 5000/- करीता नोंदणी करुन जास्तीत जास्त मातांनी योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आव्हान केले. तसेच जिल्हयातील योजनेचे काम चांगले असल्याने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या टिम व आरोग्य विभाग यांचे कौतुक केले. शिल्लक लाभार्थ्यांना करेक्शन क्यु मुळे लाभ मिळत नसल्याने सर्व गट विकास अधिकारी यांचे संपर्क साधुन आधार कॅम्प व बँक खाते कॅम्प सप्ताह दरम्यान राबविण्याबाबत सुचना दिल्या.

डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी यांनी मा.मुख्य कार्यकारी यांनी केलेल्या सुचनेचे पालन करुन आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन नविन लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहे व सप्ताह दरम्यान काम वाढविले जाईल याबाबत शाश्वती दर्शवली. तसेच सप्ताह दरम्यान आज सकाळी ठिक 8:00 वाजता नर्सिग स्कुल जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथुन मातृ वंदना सप्ताह जनजागृती रॅलीला डॉ.दावल साळवे,जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉ.अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकीत्सक जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांनी हिरवी झेंडी दाखवून सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. या दरम्यान डॉ.सोलंखी,अति.जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ.बागराज धुर्वे, आरएमओ, डॉ.सुनिल मडावी, डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ.समिर बनसोडे, डॉ.रुपेश पेंदाम, डॉ.पंकज हेमके, श्री.धिरज सेलोटे, श्री.चंदु वाघाडे उपस्थित होते. उपस्थिताचे आभार कु.अश्विनी मेंढे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना यांनी मानले.