सेवायोजना कार्डशी आधार क्रमांक लिंक करा

सेवायोजना कार्डशी आधार क्रमांक लिंक करा

भंडारा, दि. 30 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केली आहे. परंतु आधार कार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर लिंक केलेले नाही अशा उमेदवारांनी सदर नोंदणी मध्ये आधार क्रमांक लिंक करावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सु. रा झळके यांनी केले आहे.

माहिती अद्यावत करण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने विकसीत केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील (Employment) वरील रोजगार हा पर्याय निवडून (Job Seeker) Find a job नोकरी साधक हा पर्याय निवडून आपला युजर आयडी व पासवर्ड चा वापर करावा व आधार नंबर या ठिकाणी नमूद करून कॅपच्या (Captcha) टाकून सबमिट (Submit) या बटनावर क्लिक करावे, जेणेकरून आपली माहिती अद्ययावत होईल.

सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहनही सुधाकर झळके यांनी केले आहे.