फसवणुकीपासून दक्ष रहा जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे आवाहन

फसवणुकीपासून दक्ष रहा जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे आवाहन

भंडारा, दि. 30 : जिल्हा उद्योग केंद्रमार्फत उद्योग व सेवा क्षेत्राकरीता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या कर्जाच्या योजना ऑनलाईन पध्दतीने राबविल्या जातात. योजनांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र मार्फत जनजागृती मेळावे घेण्यात येत आहे. त्यांमध्ये अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करण्यास मार्गदर्शन करण्यात येत आहे. अर्जदारांना अर्ज करतांना कोणत्याही अडचणी आल्यास त्याबाबत मदत दिली जाते. अर्ज परीपूर्ण असल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कार्यबल समितीचे शिफारसीने बँकेकडे पाठविले जातात बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या प्रमाणात शहरी, ग्रामीण व खुला व आरक्षित प्रवर्गानुसार 15 ते 35 टक्के अनुदान दिले जाते.

या योजनेमध्ये कर्ज मंजुरीचे सर्वस्वी अधिकार बँकांना आहेत याबाबत या कार्यालयाच्या मार्फत सर्व संबंधितांना आवाहन करण्यात येते की, या कार्यालयाने कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेस अर्ज भरण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी प्राधिकृत केलेले नाही. यासाठी कोणी पैसे मागणी करत असल्यास या प्रकाराशी जिल्हा उद्योग केंद्राचा काहीही संबंध नाही व असा कोणी प्रकार करीत असल्यास संबंधिताची पोलीसांकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राद्वारे करण्यात आले आहे.