मराठा, कुणबी, मुलामुलींना परदेशात उच्चशिक्षणाची सुवर्ण संधी

मराठा, कुणबी, मुलामुलींना परदेशात उच्चशिक्षणाची सुवर्ण संधी

             दि.9 “छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) ही संस्था महाराष्ट्र राज्यतील मराठा, कुणबी, कुणबी – मराठा, मराठा – कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी नियोजन विभागाच्या अधिपत्त्याखाली स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थे मार्फत “महाराजा सयाजीराव गायकवाड -सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 2023-24” करिता अर्ज करण्यासाठी 15/02/2024 पर्यंत  मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विस्तृत माहिती सारथी च्या www.sarthi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन नागपूर येथील सारथीच्या विभागीय कार्यालयातील उपव्यवस्थापकीय संचालक श्री. हरिष भामरे यांनी केलेले आहे.