भंडारा : जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत 28 जुलै रोजी ऑनलाईन वेबीनार

जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत

28 जुलै रोजी ऑनलाईन वेबीनार

भंडारा, दि.23:- जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक प्रक्रियेची माहिती सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने जिल्हा जात पडताळणी समिती भंडारा यांचे मार्फत झुम ॲपवर ऑनलाईन वेबीनार 28 जुलै 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

वेबीनार मध्ये जात वैधता प्रमाणपत्राची कोणाला आवश्यकता आहे, त्यासाठी अर्ज कसा करावा, अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी याबाबत अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, उपायुक्त तथा सदस्य आर. डी. आत्राम, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी ए. व्ही. मोहतुरे हे मार्गदर्शन करणार आहे.

ऑनलाईन वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी झुम मिटींग आयडी 89490991913 व पासवर्ड 1qzceF हा आहे. ऑनलाईन वेबीनारमध्ये इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकणारे विद्यार्थी, व्यावसायिक शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, राज्य शासनाच्या सेवेत असलेले लोकसेवक, मुख्याध्यापक, प्राचार्य व कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयातील कर्मचारी यांनी सहभागी होऊन या वेबीनारच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य आर. डी. आत्राम यांनी केले आहे.