उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

चंद्रपूर, दि. 18 ऑगस्ट : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहेत शिबिराची स्थळे:

दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर, 23 ऑगस्ट रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 24 ऑगस्ट रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 25 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी, 29 ऑगस्ट रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.