सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कामाचे वाटप

सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कामाचे वाटप

Ø संबधित संस्थानी विहीत वेळेत अर्ज सादर करावे

चंद्रपूर, दि. 18 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना काम देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयास औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपूरी येथे स्वच्छता (सफाईगार) व सुरक्षारक्षक ही पदे कंत्राटी पद्धतीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांमार्फत भरण्यासंदर्भात जिल्हास्तरीय काम वाटप समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने या कार्यालयात नोंदणी असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कामाचे वाटप करण्यात येत आहे.

सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधून सदर कामाची सविस्तर माहिती जाणून घेत 5 सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावे. विहित तारखेनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र,बँकेच्या पासबुकची छायाप्रत,लेखापरीक्षण अहवाल, चालू असलेले सेवायोजन कार्ड, सभासद क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र, तसेच संबंधित सेवा सहकारी संस्था कार्यरत असावी. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी कळविले आहे.