कायदे व वाहतूक नियम विषयक मार्गदर्शन शिबिर

कायदे व वाहतूक नियम विषयक मार्गदर्शन शिबिर

चंद्रपूर, दि. 17 ऑगस्ट: जागतिक युवा दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ऑगस्ट रोजी सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे कायदे व वाहतूक नियम विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, अधिवक्ता एस. एस. मोहोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (अमली पदार्थामुळे पीडित व्यक्तींना विधी सेवा आणि अमली पदार्थाचे निर्मूलन) योजना 2015 याबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काटकर यांनी जागतिक युवा दिन या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व त्याबाबत असलेली शिक्षा यासंदर्भात माहिती दिली. तसेच अधिवक्ता मोहोरकर यांनी अँटी रॅगिंग कायद्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी, सर्व विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारत अशी प्रतिज्ञा केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरदार पटेल महाविद्यालयाचे कला शाखाप्रमुख डॉ. प्रकाश शेंडे यांनी, सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके तर आभार डॉ. सुनिता बनसोड यांनी मानले.