महिलांचे मानसिक सक्षमीकरण व स्त्री-पुरुष समानता विषयावर मार्गदर्शन Ø जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन वेबिनार कार्यक्रम

महिलांचे मानसिक सक्षमीकरण व स्त्री-पुरुष समानता विषयावर मार्गदर्शन

Ø जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन वेबिनार कार्यक्रम

चंद्रपूर, दि.10 मार्च : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक सक्षमीकरण व स्त्री-पुरुष समानता या विषयावर मार्गदर्शन व समुपदेशन सत्र घेण्यात आला. सदर कार्यक्रम ऑनलाईन वेबिनार पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.

ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार प्रिती डुडूलकर यांनी स्त्रियांचे मानसिक सक्षमीकरण या विषयावर ऑनलाईन उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तर स्त्री-पुरुष

समानता या विषयावर तहसीलदार डॉ.कांचन जगताप यांनी समुपदेशन केले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कौशल्य विकास समन्वयक श्री.मुंजनकर, प्रास्ताविक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अम्रीन पठाण तर आभार शैलेश भगत यांनी मानले. यावेळी प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम व मुख्यमंत्री महाआरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षणार्थी तसेच विविध प्रशिक्षण संस्थांचे संस्थाचालक सहभागी झाले होते.