20 जानेवारी,पासून जिल्ह्यात 144 कलम लागू

20 जानेवारी,पासून जिल्ह्यात 144 कलम लागू

भंडारा, दि. 18: जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी घेण्यात येणार परीक्षा 20 जानेवारी,2024  रोजी आयोजित केलेली आहे.तरी आपल्या जिल्हयातील सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडतील व तेथील परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी,म्हणून सदर परीक्षा केंद्रांच्या परिसरात 200 मीटर अंतरापर्यत फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम 144 अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आवश्यक झाले.

तरी जिल्ह्यात वाचा अन्वये प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय,पाचगाव,भंडारा यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये,तसेच शांतता व सुव्यवस्था टिकून रहावी याकरिता 20 जानेवारी,2024 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश संपूर्ण भंडारा जिल्हयात लागु करण्याची शिफारस केली आहे.

 त्याअर्थी मी,योगेश कुंभेजकर,जिल्हादंडाधिकारी म्हणून मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारातर्गत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सदर परीक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाण्याच्या दृष्टीने सदर परीक्षा केंद्रांच्या परिसरात 200 मीटर अंतरावरील खालील बाबी कृत्य करण्यास मनाई आदेश जारी करीत आहे.

तसेच निषिध्द क्षेत्रात झेरॉक्स मशीन व फॅक्स तसेच एस.टी.डी.बुथ परीक्षा कालावधीत सुरु राहणार नाही.परीक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन लॉपटॅप पेजर टेपरेकॉर्डर कॅमेरा इत्यादीचा वापर करता येणार नाही. निषिध्द क्षेत्रात नारेबाजी करणे,गाणी म्हणणे,वाद्य वाजविणे,भाषणे करणे,घोषणा करता येणार नाही.तसेच पाच पेक्षा जास्त इसम एकत्र येणार नाही.यांची संबंधितानी नोंद घ्यावी,असे जिल्हादांधिकारी यांनी कळविले आहे.

  शस्त्र सोटे तलवारी भाले बंदुका सुरे लाठया किंवा काठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर ठेवता येणार नाही.व कोणताही दाहक पदार्थ अथवा स्पोटक पदार्थ बरोबर नेता येणार नाही.तसेच परीक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरावर चुण्याची लाईन आखण्यात यावी, हे आदेश कर्तव्ये बजावणारे वरिष्ठ अधिकारी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना लागु राहणार नाही.

तसेच पोलिस अधिक्षक भंडारा यांनी आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निमार्ण होणार नाही.या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करुन आवश्यक पोलिस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी,सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लघन करण्यांविरुध्द  फौजदारी नियमातर्गत योग्य ती करावाई करण्यात येईल.

सदर अधिसूचना 20 जानेवारी,2024 चे सकाळी 8.00 ते  दुपारी 3.00 वाजे पर्यत अंमलात राहील.माझे सही व शिक्यानिशी आज 10 जानेवारी,2024 रोजी सदर अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.