चंद्रपूर मॅन्युअल स्कॅव्हेजर्स मुक्त जिल्हा म्हणून घोषित

चंद्रपूर मॅन्युअल स्कॅव्हेजर्स मुक्त जिल्हा म्हणून घोषित

चंद्रपूर, दि. 25 : हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या (मॅन्युअल स्कॅव्हेजर्स) नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013 च्या अनुषंगाने, जिल्हा सर्वेक्षण समिती, तालुका सर्वेक्षण समिती व उपविभागीय समिती यांनी जिल्ह्यात मॅन्युअल स्कॅव्हेजर्स (हाताने मैला उचलणारे सफाई कामगार) बाबत कृती आराखडा तयार करून सर्वेक्षण करण्यात आल्याने मॅन्युअल स्कॅव्हेजर्सची संख्या निरंक असल्याचा अहवाल समोर आला आहे.

जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पालिका, नगर पंचायत तसेच महानगरपालिका व जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी मॅन्युअल स्कॅव्हेजर्स कुठेही कार्यरत नसल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. त्या आधारावर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर जिल्हा मॅन्युअल स्कॅव्हेजर्स मुक्त घोषित केला आहे.

त्याअनुषंगाने, नागरिकांच्या काही तफावती आक्षेप व हरकती असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर येथे आक्षेप नोंदवावे, असे आवाहन समाज कल्याण, विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.