क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

चंद्रपूर ३ ऑगस्ट – क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती चंद्रपूर शहर महानगरपालिकेत उत्साहात साजरी करण्यात आली. आयुक्त राजेश मोहीते यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली, क्रांतीसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील नेते होते. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे,सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्यलेखाधिकारी मनोहर बागडे, आशिष जिवतोडे, प्रदीप पाटील,चॅनल वाकडे भूषण ठाकरे,गुरुदास नवले,अनिल बनकर, संजय बेले,विजय भुरकुंडे,संजय चौधरी,चिंतेश्वर मेश्राम, डांगे यांनीही प्रतिमेस अभिवादन करून पुष्प अर्पण केले.