जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तुमसर विधानसभा क्षेत्राचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तुमसर विधानसभा क्षेत्राचा आढावा

           भंडारा, दिनांक 6: लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  योगेश कुंभेजकर यांनी आज तुमसर विधानसभा क्षेत्राचा दौरा करून आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी दर्शन निकाळजे उपस्थित होते.

          यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गठित सर्व नोडल ऑफिसर च्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तसेच येणार 19 तारखे रोजी भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे मतदानाच्या अनुषंगाने तुमसर क्षेत्रातील मतदान केंद्रे मतदान केंद्रावरील मतदारांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधाबाबत आढावा घेतला. तसेच  मतदान प्रक्रियेतील प्रशिक्षण झालेल्य अधिकारी कर्मचाऱ्यांशी निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात  चर्चा केली.

         तुमसर विधानसभा क्षेत्रात एकूण तीन लक्ष 2 हजार 999 मतदार असून त्यापैकी 1हजार 881 हे ज्येष्ठ नागरिक आहेत .तर नव मतदार 4 हजार 864 असून  दिव्यांग मतदारांची संख्या 2441 आहे.

        मतदार जागृती विषयी केलेल्या कार्याचा आढावा सादर केला तसेच निवडणूक विषय अन्य बाबींची देखील माहिती जिल्हाधिकारी यांना.दिली येणाऱ्या 19 तारखेच्या मतदानासाठी तुमसर विधानसभा क्षेत्रातील तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.